एमपीसी न्यूज – वडगाव बार असोसिएशनच्या 2017 ते 2018 च्या नूतन कार्यकारिणीची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र गाडे पाटील यांची निवड करण्यात आली.
यावेळी वडगाव बार असोसिएशनचे माजी पदाधिकारी व ज्येष्ठ वकील अॅड. रवींद्र दभाडे, अॅड. सुहास नागेश, अॅड. अशोक ढमाले, अॅड. रवींद्र यादव आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी उपाध्यक्षपदी अॅड.मच्छिंद्र घोजगे, सचिव अॅड. अजित वहिले, सहसचिव अॅड. सुनील गाडे, खजिनदार अॅड. संतोष गुंजाळ, सदस्य अॅड. दीपक पायगुडे, अॅड. अमोल देसाई, अॅड. प्रियांका शेलार, अॅड. रेश्मा घोजगे-कराळे यांची निवड करण्यात आली आहे.