मिळालेले पुष्पगुच्छ पुण्याच्या महापौरांकडून नवमातांना भेट

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी मुक्ता टिळक यांची निवड झाल्यापासून मागील दोन दिवसामध्ये शहरातील विविध भागातील नागरिक, पदाधिका-यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने या काळात महापौर कार्यालय आणि त्यांचे घर पुष्पगुच्छांनी भरले आहे. त्यांना आलेले पुष्पगुच्छ महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील नवमातांना आज भेट देण्यात आले. या त्यांच्या अनोख्या भेट वस्तू हातामध्ये पाहून नवमातांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहावयास मिळाला.

या विषयी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, महापौरपदी निवड झाल्यावर सर्वांना आवाहन करण्यात आले होते. शहरातील नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा स्वीकारल्या असून कोणत्याही प्रकारच्या भेट वस्तू आणू नये, असे आवाहन करण्यात आले होते. तरी देखील त्यांच्याकडून देण्यात आलेले पुष्पगुच्छ कमला नेहरू रुग्णालयातील नवमतांना भेट देण्यात आले. हे देत असताना नवमातांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहावयास मिळाला. यातून समाधान मिळाल्याची भावना पाहावयास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. हे पुष्पगुच्छ मुक्ता टिळक यांच्या मुलाच्या व मुलीच्या हस्ते देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.