भोसरी एमआयडीसी येथे एस.आर. थर्माकॉल कंपनी जवळील कच-याला आग

थोडक्यात दुर्घटना टळली

एमपीसी न्यूज –  भोसरी एमआयडीसीमधील एस.आर. थर्माकॉल कंपनीजवळील कच-याला व गवताला आज (सोमवारी) दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमनदलाच्या प्रयत्नामुळे आग अटोक्यात आली असून मोठी दुर्घटना टळली आहे.

विश्वेश्वर चौकातील इंद्रायणीनगर कॉर्नर येथे ही थर्माकॉल कंपनी जवळील कच-याला आग लागली. यावेळी कंपनीतील टाकाऊ थर्माकॉल व गवत यांनी आग पकडली तसेच तेथे असलेल्या वाळलेल्या झाडानेही पेट घेतला. या सा-यामुळे परिसरात मोठे धुराचे लोट उठले होते. नागरिकांनी कळवल्यानंतर अग्निशमनदलाच्या गाड्या  थोड्याच वेळात तेथे दाखल झाल्या. यावेळी संततुकारामनगर येथील 3 बंब व भोसरी एमआयडीसीचा एक बंब यांनी ही आग विझवली आहे.

तेथे निर्माण झालेल्या धुरामुळे नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण होते. मात्र, वेळेत आग विझवण्याचे काम सुरू झाल्याने मोठी दुर्घटना टळली. यामध्ये कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही अग्निशमनदलाने स्पष्ट केले आहे.

"midc

"midc""
"midc

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.