सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

चिंचवड येथून जय आनंद पदयात्रा अहमदनगरच्या दिशेने मार्गस्थ

एमपीसी न्यूज – राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषिजी यांच्या 25 व्या स्मृति दिनानिमित्त काढण्यात येणा-या आंनद पद यात्रेला आज (सोमवार) पासून सुरुवात झाली.

चिंचवडगावातील जैन स्थानकापासून वर्धमान स्थानकवासीय श्रावक संघाचे संघपती माणिकचंद लुणावत यांच्या हस्ते जैन ध्वज दाखवून सकाळी पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी अशोख पखारिया, पोपट धोका, कांतीलाल कुमट आदी उपस्थित होते.

राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषिजी यांच्या 25 व्या स्मृति दिनानिमित्त जय आंनद पदयात्रा काढण्यात येत आहे.  105 जण पदयात्रेस सहभागी झाले आहेत. 28 फेब्रुवारीला पदयात्रा अहमदनगर येथील आनंदधाम येथे  पोहोचणार आहे.

शरद लुणावत, गणेश धोका, संदीप कांकरिया, शरद बलदोटा, विलास मुथा, सुभाष सुराणा यांनी पदयात्रेचे संयोजन केले आहे.

spot_img
Latest news
Related news