निगडी-दापोडी बीआरटीएस मार्ग आजपासून दुचाकींसाठी खुला; मात्र नागरिकांना बीआरटीएसची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज –  वाहतुकीची गैरसोय लक्षात घेता निगडी ते दापोडी या रस्त्यावर उभारलेला बीआरटीएस मार्ग आज सोमवार (दि.20) पासून दुचाकींसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर आज अनेक दुचाकी धावताना पाहावयास मिळाल्या.

निगडी-दापोडी बीआरटीएस मार्ग हा तीन वर्षापासून बांधला गेला असला तरी मार्गावरील बस थांब्याची दुरावस्था, तसेच मार्ग बांधणीचा अंदाज चुकणे आदी अडचणीमुळे आत्तापर्यंत रखडला आहे. त्यामुळे शहराच्या मधोमध असणारा तयार रस्ता वापरात नव्हता. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शिफारशीनंतर हा मार्ग आजपासून दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.

मात्र, या मार्गावर दुचाकी नाही तर बीआरटीएस बसच धावावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचतर्फे करण्यात आली आहे. निगडी-दापोडी हा मार्ग गेल्या तीनवर्षापासून तयार आहे. मात्र नियोजनाचा अभाव, दुरुस्तीची कामे यामुळे तो रखडला आहे. आयुक्त दिनेश वाघमांरे यांनी महापालिकेच्या आयुक्त पदाची धुरा सांभाळताच तो  डिसेंबर 2016 ला चालू करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, मार्गाच्या फाईलच वेळी पुढे न सरकणे, राजकीय विरोध अशा अनेक बाबीत हा मार्ग तयार असूनही वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहे.

आज जरी दुचाकी चालू झाल्या असल्या तरी अनेक नागरिकांना बीआरटीएस बसच या मार्गावरून धावली पाहिजे, असा आग्रह आहे. कारण शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीला आणण्यापेक्षा ती सक्षम बनवणे गरजेचे आहे. प्रशासनाने मात्र, ही तात्पूर्ती उपाय योजना असून या मार्गावरून बीअरटीएसच धावेल, असे सांगितले आहे.


"brt
"brt

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.