बांधकाम व्यवसायातून पहिल्यांद्याच राजकारणात – संतोष कांबळे

 

एमपीसी न्यूज – संतोष कांबळे यांनी  सांगवी येथून  महापालिकेची निवडणूक लढवली होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना  कांबळे यांना पहिल्याच  प्रयत्नात यश मिळाले आहे. मुळचे व्यायवसायीक असणारे कांबळे यांचा हा राजकारणातील पहिलाच प्रयत्न होता. ज्यामध्ये त्यांना जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले आहे.

याविषयी बोलताना  संतोष कांबळे म्हणाले की, मी राजकारणात येईन, असे मला कधीच वाटले नव्हते. मला तशी इच्छाही नव्हती मात्र प्रभागत पडलेले आरक्षण व नागरिकांचा आग्रह म्हणून मी निवडणुकीत उतरलो व मला पहिलयाच प्रयत्नात यश मिळाले. त्यामुळे माझ्यासाठी ही सुखद धक्काच होता. कारण मी मुळ व्यायवसायी आहे. माझा 2008 सालापासून बांधकाम व्यवसाय आहे. त्यापूर्वी मी नोकरी करत होतो त्यामुळे मी कधी राजकारणात येईन किंवा नगरसेवक होईन असे वाटले नव्हते. पण जनतेने मला ती संधी दिली आणि मी विजयी झालो.

पहिल्यांदा शहराच्या सभागृहात जाण्याची संधी मिळाली तशीच माझी जबाबदारीही तेवढ्याच पटीने वाढली आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कांबळे हे मुळचे सांगवीचेच. त्यांनी पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयातून बीएससीच्या पदवीसाठी प्रवेश घेतला होता मात्र घरच्या परिस्थीतीमुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. पुढे नोकरी करत-करत त्यांनी  स्वतःचाच यश डेव्हलपर्स या नावाने व्यवसाय सुरु केला. त्यात त्यांना नगरसेवक पदाची जबाबदारीही मिळाली. त्याबरोबरच 2010 पासून फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सांगवी परिसरात विविध उपक्रम राबवले.

 

संतोष कांबळे याना वैयक्तीक आवडीमध्ये मैदानी खेळ खेळायला आवडतात. त्यांची व्यवसायातील आवड पाहता त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आगामी कामाविषयी बोलताना कांबळे म्हणाले की,  मला तरुणांना व महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यायची आहे. त्यासाठी मी प्रयत्नही करत आहे. कोणतेही राजकारण न करता सामाजिक कामे करायची माझी इच्छा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.