पुण्यात बेकरी कामगारांचा 23 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज  – पुणे शहरात बेकरी चालकांना संरक्षण मिळावे. तसेच बेकरीतील कामगारांना नुकसान भरपाई मिळावी, या अशा अनेक मागण्यासाठी  23 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून त्या दिवशी शहरातील बेकरी व्यावसयिक बंद पाळणार आहेत. अशी घोषणा महाराष्ट्र बेकरी उत्पादक श्रमिक महासंघाचे अध्यक्ष नाना क्षीरसागर यांनी केली.

यावेळी क्षीरसागर म्हणाले की, मागील काही महिन्यात शहरातील बेक-यांमध्ये अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये निष्पाप कामगाराचा बळी गेला असून या घटना लक्षात घेता कामगाराना संरक्षण मिळावे, त्याचबरोबर बेकरी चालकांना आरोग्य परवाना सुलभपणे मिळावा तसेच त्यांच्यावर होणा-या हल्ल्याची नुकसान भरपाई मिळावी, या अनेक मागण्यांसाठी शहरातील सर्व बेकरी चालक संपामध्ये सहभागी होणार आहेत.

यामध्ये जवळपास 2 हजार टेम्पोचालक आणि 5 हजार छोटे मोठे व्यासायिक देखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.