प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी वेहेरगाव रोडवर आज होडी आंदोलन


एमपीसी न्यूज – मागील अनेक वर्षापासून पावसाळ्यात सातत्याने वेहेरगाव रोड पाण्याखाली जात असताना सार्वजनिक बांधकाम विभाग, मावळचे अधिकारी याकडे दुलर्क्ष करत आहे. जर मार्ग दुरुस्त करता येत नसेल तर याठिकाणी जल वाहतुक सुरु करावी अशी उपरोधक मागणी करत समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी दहा वाजता या मार्गावर होडी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मनविसेचे मावळ तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांनी दिली.

कुटे म्हणाले वेहेरगावच्या डोंगरावर कुलस्वामीनी आई एकविरेचे मंदिर आहे. प्राचिन कार्ला लेणी असल्याने राज्यभरातून भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी येत असतात. वेहेरगाव व दहिवली ग्रामस्त, शाळकरी विद्यार्थी, कामगार यांना याच मार्गावरुन पाण्यातून जिव धोक्यात घालून दररोज मार्गक्रमण करावे लागते. वेहेरगाव रोडच्या दोन्ही बाजुला असणारे नाले साफसफाई अभावी काही ठिकाणी बंद झाले आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणांमुळे त्यांचे अंतर कमी झाले तर काही ठिकाणी नालेच गायब झाले आहेत.

वारंवार याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार व मागणी करुन देखिल ते रस्ता दुरुस्ती व नाले सफाईच्या कामाकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांना मागील काही वर्षापासून पावसाळ्यात या जलमय मार्गावरुन प्रवास करावा लागतो आहे. मागील तिन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने रस्त्यावरुन सर्वत्र पाणी वाहत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.