पिंपरी एमआयडीसी येथे महिलेच्या गळ्यातील गंठन हिसकावले


एमपीसी न्यूज – पिंपरी येथील मार्केटमध्ये खरेदी करुन दुचाकीवरुन चिखली कडे जाणा-या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन चोरट्यांनी हिसकावले. ही घटना काल (सोमवारी) रात्री साडे आठच्या सुमारास पिंपरी एमआयडीसी एच ब्लॉक येथे घडली.

मनिषा सुनिल पाटील (वय.27 रा चिखली) यां पिंपरीगाव येथून खरेदी करुन पाती समवेत गाडीवर बसून घरी जात असताना दोन अज्ञातांनी पाठीमागून दुचाकीवरुन येवून संबंधीत महिलेच्या गळ्याचतील मीनी गंठन हिसकावसे. यामध्ये अर्धाभाग चोरट्यांच्या हाती लागला तर अर्धा महिलेजवळच राहीला. अंधार असल्यामुळे चोरट्यांची ओळख पटू शकलेली नाहीय.यामध्ये महिलेचे 40 हजार किंमतीचे व दिड तोळे वजनाचे सोने चोरीला गेले आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध सोन साखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.