लोणावळा येथील क्रांतीनगरमध्ये अपंग युवकाची आत्महत्या


एमपीसी न्यूज –  कुसगाव येथील क्रांतीनगर वसाहतीत एका अपंग युवकाने अज्ञात कारणांमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज गुरुवारी दुपारी अडीच सुमारास घडली आहे. 

समीर महादू ढाकोळ ( वय- ३५, रा. क्रांतीनगर, कुसगाव बुद्रुक, लोणावळा ) असे फाशी घेवून आत्महत्या केलेल्या अपंग युवकाचे नाव आहे. याबाबत समीर याचा भाचा शुभम दत्तात्रय दळवी (रा. ओळकाईवाडी, कुसगाव, लोणावळा) याने तक्रार दाखल केली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर हा दोन्ही पाय व एका हाताने अपंग होता. तसेच अविवाहित होता. तो कुसगाव येथील ओळकाईवाडी येथे राहणारा असून, सध्या तो त्याच्या बहिणीकडे क्रांतीनगर येथे रहात होता.  त्याने गुरूवारी दुपारी अडीचच्या पूर्वी क्रांतीनगर येथील राहत्या घरातील सिलींनग फॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अद्याप आत्महत्ये चे कारण समजले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे आर. एस. पलांडे हे करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.