प्राधिकरण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी विलास गावडे

सचिवपदी अजय लंके यांची निवड
 
एमपीसी न्यूज- प्राधिकरण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी विलास गावडे तर सचिवपदी अजय लंके यांची निवड करण्यात आली. चिंचवड येथे झालेल्या पदग्रहण सोहळ्यात त्यांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर, मावळते अध्यक्ष रपेल जोस, सचिव रोटरीयन प्रभू  हिरेमठ, आय.पी.डी.जी प्रशांत देशमुख यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. 


2017-2018 ची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
 
खजिनदार-  सुधीर शितोळे, वैद्यकिय प्रकल्प –  बहार शहा,  प्रकल्प संचालक – सुनील कुलकर्णी, फौंडेशन संचालक  – बलवीर चावला, क्लब अडमिन – डॉ. महेश पाटील, आयटी संचालक  – ग्याविन अँथॉनी, पीआर अँड पीआय – अजित जकनवार, न्यु जरनालीशन -आदिती जोशी, मेंबरशिप – शिरीष सबॅस्टियन , प्रेसिडेंट इलेक्ट- वैजयंती आचार्या,  एमिडेड पास्ट प्रेसिडेंट- रेफिल जोस, क्लब ट्रेनर -सतीश आचार्या यांची निवड करण्यात आली. 

येणा-या वर्षात कला, क्रीडा, सामाजिक असे विविध उपक्रम राबविण्याचा मानस अध्यक्ष विलास गावडे  व सचिव अजय लंके यांनी व्यक्त केला. आतापर्यत रोटरी क्लबने विविध सामाजिक उपक्रम राबविले असे डॉक्टर शैलेश पालेकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष सबॅस्टियन यांनी केले. सूत्रसंचालन  विलास गावडे यांनी केले. आभार  वैजयंती आचार्या यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.