२१ एप्रिल : दिनविशेष

What Happened on April 21, What happened on this day in history, April 21. See what historical events occurred, which famous people were born and who died on April 21.

२१ एप्रिल : दिनविशेष – भारतीय नागरी सेवा दिन

२१ एप्रिल – महत्वाच्या घटना

  • ७५३ ईसा पूर्व: रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)
    १९६०: रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.
    १९७२: अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
    १९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.
    २०००: आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमलात आणला.

२१ एप्रिल – जन्म

  • १८६४: जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९२०)
    १९२२: स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९८७)
    १९२६: इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचा जन्म.
    १९३४: महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचा जन्म.
    १९४५: भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांचा जन्म.
    १९५०: हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म.

२१ एप्रिल – मृत्यू

  • १५०९: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सातवा) यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १४५७)
    १९१०: अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८३५)
    १९३८: पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ सर मुहम्मद इक्बाल यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)
    १९४६: ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८३)
    १९५२: इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८८९)
    २०१३: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.