२१ ऑक्टोबर : दिनविशेष

What Happened on October 21, What happened on this day in history, October 21. See what historical events occurred, which famous people were born and who died on October 21.

२१ ऑक्टोबर : दिनविशेष – भारतीय पोलीस स्मृती दिन

२१ ऑक्टोबर – महत्वाच्या घटना

  • १८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.

    १८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.

    १८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.

    १९३४: जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.

    १९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.

    १९४३: सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.

    १९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.

    १९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.

    १९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.

    १९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.

    १९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

    १९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

    १९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

    २००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.

२१ ऑक्टोबर– जन्म

  • १८३३: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १८९६)

    १८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६१)

    १९१७: गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)

    १९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांचा जन्म.

    १९३१: हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मी कपूर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११)

    १९४९: इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचा जन्म.

२१ ऑक्टोबर– मृत्यू

  • १४२२: फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)

    १८३५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १७७५)

    १९८१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक)

    १९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२१)

    १९९५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९२५)

    २०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)

    २०१२: चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.