Wakad : विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

एमपीसी न्यूज – विवाहितेने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेआठच्या सुमारास विजयनगर, काळेवाडी येथे उघडकीस आली.

सरिता सचिन खुंजावटे (वय 26, रा. ओंकार कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2013 मध्ये सरिता यांचा सचिन खुंजावटे यांच्याशी विवाह झाला होता. खुंजावटे कुटुंबीय हे मुळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. ते मागील काही वर्षापासून काळेवाडी येथे राहत आहेत. सरिता यांचे पती सचिन हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. रविवारी रात्री सर्वजण घरात असताना सरिता यांनी अचानक त्यांच्या खोलीचे दार बंद करून गळफास लावून घेतला. घरातील सदस्यांनी बराच वेळ दार ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी शेजाऱ्यांच्या मदतीने खोलीचे दार तोडून सरिता यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.