Suicide Data : बेरोजगारी, कर्जबाजारीपणामुळे तीन वर्षात 25 हजार आत्महत्या

एमपीसी न्यूज – भारतात बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे जवळपास तीन वर्षात 25 हजार आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. राज्यसभेत विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सरकारने याबाबत माहिती दिली आहे. 

राज्यसभेत आर्थिक समस्या (कर्जबाजारीपणा) आणि बेरोजगारी यामुळे आत्महत्या केलेल्यांची संख्या आणि सरकारने या आत्महत्या रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत लेखी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या प्रश्नाला गृह खात्याच्या वतीने उत्तर देण्यात आले.

सरकारने दिलेल्या या उत्तरात असं म्हटलं आहे की, राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) वतीने साल 2020 पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्या आकडेवारीनुसार 2018 ते 2020 या तीन वर्षांत 25 हजार 231 जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

बेरोजगारीमुळे आत्महत्यांची संख्या –

  • 2018 – 2741
  • 2019 – 2851
  • 2020 – 3548

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांची संख्या –

  • 2018 – 4970
  • 2019 – 5908
  • 2020 – 5213

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.