पानशेत धरणातून 2834 क्युसेक्स तर खडकवासला 3424 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज : पुणे शहरात तसेच खडकवासला धरणसाखळीत पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पानशेत धरणाचा विसर्ग 2834क्युसेक्स पर्यंत वाढविला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातुन सोमवारी रात्री अकरा वाजता 3424 क्युसेक्स पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे.

मागील 24 तासात खडकवासला येथे 30 मिलिमीटर पाऊस पडला तर पानशेतला 68, वरसगावला 70 तर टेमघर येथे 82 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पानशेत धरणामधून 990 क्युसेक्स पाणी सोडले जात होते. तो विसर्ग दुपारी 2834 क्युसेक्स पर्यंत सुरू असून यासह वीज निर्मितीसाठी 625क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.