भोसरी महोत्सव म्हणजे करमणुकीची मेजवानी – महापौर नितीन काळजे

एमपीसी न्यूज – भोसरी महोत्सवामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना करमणुकीची मेजवानी मिळत असून कला जोपासण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे मत महापौर नितीन काळजे यांनी भोसरी येथे व्यक्त केले. भोसरी कला क्रीडा मंचद्वारे आयोजित भोसरी महोत्सव २०१७ चे उद्घाटन महापौर नितीन काळजे आणि अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी आमदार महेश लांडगे, नगरसेवक संतोष लोंढे, नगरसेविका सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, माजी नगरसेविका सुनंदा फुगे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते भानुदास फुगे, मंचाचे अध्यक्ष नगरसवेक अॅड. नितीन लांडगे आदी उपस्थित होते.

या वेळी आमदार लांडगे म्हणाले, "भोसरी कला क्रीडा मंचद्वारे भोसरी महोत्सव गेल्या दहा वर्षापासून चांगल्या प्रकारे राबविला जात आहे. भोसरी महोत्सवामुळे गणपती उत्सवात रंगत भरली आहे. त्याचप्रमाणे विविध नाटके पाहण्याचाही आनंद जनतेला मिळत आहे" या वेळी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी अभिनय केलेल्या ‘बायांनो नवरे सांभाळा’ हे विनोदी नाटक सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय फुगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष भरत लांडगे, सचिव भाऊसाहेब डोळस, नंदू लोंढे, संदीप राक्षे, विजय लांडगे, निवृत्ती फुगे, श्याम लांडगे, दत्ता कृष्णा फुगे, राजेंद्र सिंग, पंढरीनाथ हजारे, किरण लांडगे, सुनील लांडगे आदींनी परिश्रम घेतले.

बुधवारी (ता. ३०) भोसरी महोत्सवामध्ये आंतरशालेय नृत्य स्पर्धा सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी पाच वाजता मिस पिंपरी-चिंचवड ही स्पर्धाही होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.