पुणे शहर पोलीस परिमंडळ 3 च्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलीस परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, चतु:श्रुंगी विभागाने पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ गार्डनमध्ये महिला दिनानिमित्त ‘ती’ चे अवकाश, ती यशस्वी, ती मनस्वी’ हा कार्यक्रम घेण्यात आला.

 

यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पुण्याच्या भावी महापौर मुक्ता टिळक, प्रियदर्शनी हिंगे: सोशल माध्यमातून सल्लागार व महुवा नारायण: हॉटेल अॅबेसियाच्या मालक व बावधन इंडस्ट्रीच्या अध्यक्षा, व चतु:श्रुंगी विभागच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वैशाली माने/जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, दयानंद ढोमे, श्रीधर जाधव, अरुण वायकर, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी खास गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित अक्षय घोळवे यांनी केले. तसेच यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकातील 32 प्रभागातून निवडून आलेल्या सर्व महिला नगरसेविका यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपळगुरव जिजाऊ माता  म्हणजे डायनासोर गार्डनमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात महिलांच्या गुजगोष्टीतून एक महिला कशी उंच मनोरे गाठत गेली. यावेळी तिला कोण कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले. हे या कार्यक्रमातून अनुभवता आले.

 

यावेळी प्रमुख पाहुणे यांचा सत्कार वैशाली माने यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी प्रेरणा सहाणे (ऐकू न येताही उत्तम डान्स करणारी महिला) तसेच आयबीएन लोकमतच्या महिला पत्रकार हलिमा खुरेशी, अपंगत्वावर मात करून पोहण्याची कला आत्मसात करणारी गौरी गाडगीळ, 35 हजार नागरिकांचे डोळ्यांचे ऑपरेशन करणा-या डॉ. वंदना शिरस्तीकर यांचा वैशाली माने यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी प्रमुख पाहुणे सोनाली कुलकर्णी हिने "मी अभिनय हा मनापासून करते व मी वेळ पाळते "व "यश अपयश हे पचवता आले पाहिजे", असे मत व्यक्त केले.

 

तसेच लेडी सिंघम म्हणून ज्यांची ओळख त्या वैशाली माने पोलीस अधिकारी म्हणाल्या "महिला म्हणून नेहमी अॅक्टिव्ह असावे" व "पोलीस हा पण समाजाचा घटक आहे तो कायदयात बांधला आहे" हे यावेळी नमूद केले.

 

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश ढमाले व अक्षय घोळवे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.