३१ ऑगस्ट : दिनविशेष

What Happened on August 31, What happened on this day in history, August 31. See what historical events occurred, which famous people were born and who died on August 31.

३१ ऑगस्ट : दिनविशेष – बालस्वातंत्रदिन.

३१ ऑगस्ट – महत्वाच्या घटना

  • १९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.
  • १९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात.
  • १९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
  • १९५७: मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.
  • १९६२: त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.
  • १९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
  • १९७०: राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
  • १९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
  • १९९१: किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
  • १९९७: प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.

३१ ऑगस्ट– जन्म

  • १५६९: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १६२७)
  • १८७०: इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ मारिया माँटेसरी. पूर्वप्राथमिक शाळानां माँटेसरी या नावाने ओळखले जाते यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९५२)
  • १९०२: रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्म.
  • १९०७: फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५७)
  • १९१९: कागज ते कॅन्व्हास या कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी भाषेतील प्रथितयश लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर २००५)
  • १९३१: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २००५)
  • १९४०: मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००२)
  • १९४४: वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉइड यांचा जन्म.
  • १९६३: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक ऋतुपर्णा घोष यांचा जन्म.
  • १९६९: जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा जन्म.
  • १९७९: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते युवन शंकर राजा यांचा जन्म.

३१ ऑगस्ट– मृत्यू

  • १४२२: इंग्लंडचा राजा हेन्री (पाचवा) यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १३८६)
  • १९७३: शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९२)
  • १९९५: खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची शक्तिशाली बाॅम्बस्फोटाद्वारे हत्या. (जन्म: १९ फेब्रुवारी १९२२)
  • २०१२: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९३८)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.