BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : मावळ गर्जना प्रतिष्ठानची दहिहंडी एस. बी. क्रीडा मंडळ काळा चौकी-मुंबईने फोडली

एमपीसी न्यूज़ – वडगाव मावळ येथील मावळ गर्जना प्रतिष्ठान वडगाव मावळचे वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवारी (दि. २४) श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर भव्य दहिहंडी स्पर्धैचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची दहीहंडी दहिहंडी एस.बी.क्रीडा मंडळ काळा चौकी-मुंबईने फोडली. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सभारंभ पार पडला.

मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांचे प्रेरणेने आणि नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव, तळेगांव नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते किशोर भेगडे, पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर,मावळ तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेशआप्पा ढोरे, (वडगांव नगरपरिषद) नगराध्यक्ष मयुर ढोरे, मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, व्हाइस चेअरमन चंदु ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, खरेदीविक्री संघ मावळचे माजी व्हा.चेअरमन पंढरीनाथ ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस,पुणे जिल्हा सरचिटणीस राजेश बाफना, दैनिक ‘पुढारी’काहे ज्येष्ठ पत्रकार गणेश विनोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या दहिहंडी सोहळ्यात मुंबई, ठाणे, खोपोली, लोणावळा येथील २७ गोविंदा पथकांनी सहभाग नोंदविला. या वर्षीची दहिहंडी फोडण्याचा मान एस.बी.क्रीडा मंडळ काळाचौकी-मुंबई यांना मिळाला. त्यांनी ७ थरांचे मनोरे उभारुन यशस्वीरीत्या दहिहंडी फोडली. विजेत्या पथकाचा सन्मान या.सचिनभाऊ चिखले, नगरसेवक,गटनेते, शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड यांचे हस्ते करण्यात आला.

वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या भव्य प्रांगणात आकर्षक रक्कम रुपये.५ लाख ५५ हजार ५५५/- रोख बक्षीसासह गोविंदा पथकांचे नियोजनबध्द, हर्षोल्लासात, जोशपूर्ण वातावरणात तसेच वडगाव मावळ आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.

हा सोहळा पाहण्यासाठी वडगांव नगरपंचायतमधील सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते, उपस्थितांचे स्वागत उद्योजक सुनिल शिंदे आणि मनसे नगरसेविका सायली म्हाळसकर यांनी केले. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून या सोहळ्यासाठी जमविलेली वर्गणी गोविंदा पथकांना न देता ती मदत कोल्हापूर/सांगली येथील पूरग्रस्तांना रोख स्वरूपात पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी जीवनावश्यक खाद्यपदार्थ, कपडे, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या यापुर्वीच पाठविण्यात आलेल्या आहेत.

हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी वडगांव मावळचे​आहे पोलीस स्टेशनचे उत्तम सहकार्य लाभले. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी कार्यक्रमास भेट देऊन चोख बंदोबस्त ठेवला. त्याचप्रमाणे पोटोबा देवस्थान आणि वडगांव नगर पंचायत यांनीही विशेष सहकार्य केले.

गगन डान्स अकॅडमी, तळेगांव दाभाडे येथील कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केले.तसेच वडगाव आणि परिसरातील तरुणाईने (मुले,मुली,महिला) साउंड सिस्टीमच्या तालावर नाचून या दहिहंडी सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.

त्याचप्रमाणे हा सोहळा पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य मच्छिंद्र मोहीते,संतोष म्हाळसकर,सुहास इंदलकर, प्रकाश जुगदार, नवनाथ शिवेकर, आकाश वारिंगे, गणेश म्हाळसकर, दिनेश म्हाळसकर, देवदत्त लोकरे, अजिंक्य शिंदे, ओंकार भांगरे, अनिल म्हाळसकर, अनिल नायर बाबुराव म्हाळसकर,लहुदास म्हाळसकर, विजय पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव तानाजी तोडकर आणि सागर शेलार यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like