Pune : डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे गुरुवारी प्रकाशन

9 ऑगस्ट क्रांती दिनी यशवंत सिन्हा यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज- युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनी ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे.

‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, ‘युवक क्रांती दल’ आणि ‘प्रफुल्लता प्रकाशन’ यांच्या संयुक्तविद्यमाने होणार्‍या या प्रकाशन कार्यक्रमाबाबत डॉ.कुमार सप्तर्षी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. प्रकाशन सभारंभ गुरुवारी, 9 ऑगस्ट क्रांती दिनी, सायंकाळी 6 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे.

1970 च्या दशकात डॉ.कुमार सप्तर्षी यांना अनेक सामाजिक आंदोलनानंतर तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास ही इष्टापत्ती मानून डॉ. सप्तर्षी यांनी तुरुंगात घेतलेले अनुभव, वाचन, चर्चा आणि त्यांचा आयुष्यावर झालेला परिणाम याबाबत चे लेखन ‘ येरवडा विद्यापीठातील दिवस ‘ या पुस्तकात आहे.

क्रांती दिन आणि युवक क्रांती दलाच्या 17 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उपस्थित राहणार आहेत.

बापूजींच्या पावन स्थळांना भेट देण्यासाठी यात्रेचे आयोजन

2 ऑक्टोबर 2018पासून गांधीजींच्या जन्माला 150 वर्ष होत आहेत. त्यानिमित्त भारतीय स्वातंत्र्यलढा आणि गांधीजींच्या कार्याशी संबंधित ठिकाणांना भेट देणारी यात्रा काढली जाणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे यात्रेचे आयोजन केले जाणार आहे,अशी माहिती देखील या पत्रकार परिषदेत देण्यात आली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.