Pimpri: पाणीपुरवठ्याचे आंदोलन राष्ट्रवादीला पडले महागात ; विरोधी पक्षनेता, दोन माजी महापौरांसह 11 नगरसेवकांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत आंदोलन करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना चांगलेच महागात पडले आहे. विनापरवाना जमाव जमवून घोषणाबाजी केल्याचे कारण देत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह 11 नगरसेवकांविरोधात पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार दीपक वणवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, अर्पणा डोके, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे, समीर मासूळकर,मयुर कलाटे,सुलक्षणा धर, पोर्णिमा सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शुक्रवारी (दि.3) पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना कार्यालयात कोंडून ठेवत बाहेरुन कार्यालयाला टाळे लावले होते. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत जोरदार घोषणाबाजी केली होती.

पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अय्युबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, विशाल कांबळे यांना कोंडण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.