Pune : धनगर समाजातील एक लाख महिला मुख्यमंत्र्यांना पाठवणार राख्या

203

एमपीसी न्यूज- मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद नंतर आज (शुक्रवार) धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने पुण्यात कौन्सिल हॉलच्या बाहेर धरणे आंदोलन केले जात आहे. धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, यासाठी धनगर समाजातील एक लाख महिला राखी पाठवणार आहेत.

HB_POST_INPOST_R_A

असे असेल धनगर समाजाचे आंदोलन

@ 10 ऑगस्टला पुण्यात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

@ 14 ऑगस्टला राज्यातील सर्व तहसील कार्यालयावर एकदिवसीय मोर्चा व ठिय्या

@ 24 ऑगस्ट राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

@ 8 सप्टेंबर रोजी चौंडी येथे महामेळावा

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: