Pune : दीपक मानकर यांच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक मानकर यांच्या न्यायलयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दीपक मानकर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दीपक मानकर अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय ते थेट सर्वोच्च न्यायालयात गेले मात्र सगळीकडून त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने अखेर एक ऑगस्ट रोजी सकाळी ते लष्कर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांसमोर हजार झाले. त्यांना रितसर अटक करुन न्यायालयात नेण्यात आले. विशेष न्यायाधीश ए़ एस़ महात्मे यांनी मानकर यांना ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत नेण्यात आले़. मात्र त्याच रात्री त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितल्यामुळे त्यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायलयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली. दीपक मानकर यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.