pune : पुणे विमानतळावर 66 लाखांचे सोने पकडले

एमपीसी न्यूज : शरीराच्या आत मध्ये सोने लपून तस्करी केल्याचा प्रकार पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आला आहे. यामध्ये चार महिलांना पकडण्यात आले आहे. प्रथमच महिलांनी गुदाशयात सोने लपवून आणल्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत. त्यांच्याकडून दोन किलो 35 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोने जप्त केले आहे. त्याची किंमत तब्बल 66 लाख 50 हजार रुपये इतकी आहे.

खावला इहादी अहमेद अमरा, महसीब मसरी अहमद अदाम, सलमा सलाह मोहम्मद यासिन आणि मनाल इल्तयाब अबदुल्ला महंमद या चौघींना केंद्रीय सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे.

अरब देशातून स्पाइसजेट क्रमांक एसजी-52 मधून काही महिला पुणे विमानतळावर उतरणार असल्याची माहिती बुधवारी सकाळी केंद्रीय सीमा शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार त्यांनी या विमानातील प्रवाशांवर नजर ठेवली होती. त्यांनी महिलांची तपासणी सुरू केली असता काही महिलांच्या हालचालींचा त्यांना संशय आला. त्यांची कसून तपासणी केली असता त्या महिलांनी गुदशयात धातू लपवला असल्याचे समजले.

त्या महिलांची वैद्यकीय तपासणी केली असता या चौघींच्या गुदाशयातून तब्बल दोन किलो 35 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे. त्याची किंमत तब्बल 66 लाख 50 हजार रुपये इतकी आहे.

सहाय्यक आयुक्त हर्षल मेटे म्हणाले, यापूर्वी सोने तस्करी साठी पुरुष गुदाशमध्ये सोने लपून आणत होते यावेळी प्रथमच महिलांनी अशा प्रकारे सोनी तस्करी केल्याचे समोर आले आहे. हे सोने सापडू नये याची त्यांनी खबरदारी घेतली होती परंतु कसून तपासणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.