Nigdi | यमुनानगर येथील अपंग विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- यमुनानगर येथील अपंग विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना संस्थचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघमोडे यांच्या हस्ते उत्कृष्ठ सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यमुनानगर येथील अपंग विद्यालयातील कौशल्य शिवथरे, मंगला पवार, भारती मोरे आणि अप्पासाहेब दाभाडे यांच्या सेवासमाप्ती बद्दल उत्कृष्ठ सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी नवनाथ वाघमोडे, वैशाली भोईटे, विजया वाघमोडे, डी के भोईटे, कानगुडे, शरद फाळके, माया धावले, बिडवे आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संस्थचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघमोडे यांनी सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्यकाळातील आठवणी जागवून त्यांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल गौरवोद्गार काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.