Chikhali : एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने 69 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेचा विश्वास संपादन करून महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याकडे असलेले एटीएम (Chikhali) वापरून 69 हजार 248 रुपये काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार रविवारी (दि. 16) सायंकाळी सात ते आठ वाजताच्या कालावधीत महादेवनगर चिखली येथे घडला.

 

याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Charholi : सात वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मुलाचे एटीएम कार्ड घेऊन महादेवनगर चिखली येथील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. (Chikhali) त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या मुलाचे एटीएम कार्ड वापरून खात्यातून 69 हजार 248 रुपये काढून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.