Pune : ….. तर पुढच्या वर्षी गणपतीचे चित्र असलेल्या फ्लेक्सची मिरवणूक काढू !

डी जे बंदीच्या विरोधात पुण्यातील नरेंद्र मंडळाचा निषेध

एमपीसी न्यूज- नरेंद्र मंडळाने लक्ष्मी रस्त्यावर फ्लेक्स लावून डी जे बंदीचा निषेध नोंदवला आहे. यंदाही बाप्पाची मिरवणूक वाजत गाजत काढणार होतो पण विद्यमान दरबारींच्या काही चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला फटका बसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यंदा उच्च न्यायालयाने डीजे बंदीच्या बाबतीत अतिशय कणखर भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील डी जे ववणाऱ्या मंडळावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डीजे बंदीचा निषेध नोंदवून पुण्यातील नरेंद्र मंडळाने फ्लेक्सच्या माध्यमातून आपली नाराजी प्रकट केली आहे.

‘ध्वनी प्रदूषण म्हणून साऊंड नाही लावले, थर्माकॉल, प्लॅस्टिकचे प्रदूषण नको म्हणून देखावा नाही, पीओपीमुळे प्रदूषण नको म्हणून मूर्तीही फायबरची बसवली, हे सुद्धा नको असल्यास पुढच्या वर्षी फ्लेक्सची स्थापना करू’ असा उपहासात्मक बॅनर नरेंद्र मंडळाने लावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.