Lonavala : स्काऊट गाईड संघनायकांचे प्रशिक्षण शिबिर लोणावळ्यात उत्साहात

एमपीसी न्यूज- पुणे भारत स्काऊट गाईड यांच्या वतीने आयोजित मावळ तालुका स्काऊट गाईड संघनायक प्रशिक्षण शिबिर बुधवारी (दि. 26) लोणावळ्यामध्ये व्ही पी एस् हायस्कूलच्या प्रांगणात झाले.

तळेगाव येथून इंद्रायणी इंग्लिश स्कूल, आदर्श विद्यामंदिर, मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूल तसेच प्रगती विद्यामंदिर इंदोरी, न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड, न्यू इंग्लिश स्कूल वडगाव आणि लोणावळा शहरातील व्ही पी एस हायस्कूल, आंतरभारती बालग्राम, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, डॉन बॉस्को हायस्कूल, नागनाथ विद्यालय औंढे, लोनप माध्य खंडाळा, लोनप उर्दू माध्यमिक व लोनप प्राथमिक विद्यालये इ. पंधरा विद्यालयातील 260 स्काऊट गाईड मुलामुलींनी या प्रशिक्षण शिबिराद्वारे नेतृत्वाचे धडे गिरवले.

नेतृत्वासाठी आवश्यक गुण, कौशल्ये, क्षमता व ज्ञान इत्यादींच्या प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. लोणावळा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुजाता देशमाने, व्ही पी एस चे प्राचार्य सुधींद्र देशपांडे व पुणे भारत स्काऊट गाईड सहसचिव सरला भोसले यांनी शिबिराला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

स्काऊट गाईंडचे सहाय्यक जिल्हा आयुक्त व शिबिर प्रमुख विजय जोरी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नप्रभा गायकवाड, शीतल भोसले, वृषाली खोजरे, सुप्रिया हिंगे, यशश्री काजळे, प्रतीक्षा ढवळे, संजय पालवे, विशाल मोरे, संजय शिंदे, माऊली हिरवे, देवराम पारिठे, साहेबराव चव्हाण यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.