Pimpri : जागतिक पातळीवर टाटा मोटर्सच्या वाहनविक्रीमध्ये वाढ ; सव्वा लाख वाहनांची विक्री

एमपीसी न्यूज- जागतिक स्तरावर सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीमध्ये मागील वर्षापेक्षा 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा 1 लाख 23 हजार 577 वाहनांची विक्री झाली.

जागतिक स्तरावरील बाजारपेठेत सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन आणि टाटा देवू या रेंजमधील एकूण 52,018 वाहनांची विक्री झाली. मागील वर्षी सप्टेंबर मधील वाहन विक्रीपेक्षा 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये जागतिक स्तरावर घट आल्याचे दिसून आले आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात 71,559 प्रवासी वाहनांची विक्री झाली असून सप्टेंबर 2017 च्या तुलनेत यामध्ये 4 टक्क्यांची घट झाली आहे.

जागतिक स्तरावर टाटामोटर्सच्या एकूण 52,987 जग्वार लँडरोव्हर गाड्यांची विक्री झाली असून 18,876 जग्वार मॉडेलच्या गाड्या विकल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे 34,111 लँडरोव्हर गाड्यांची विक्री झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.