ताथवडे येथे ट्रकच्या धडकेत 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू


एमपीसी न्यूज – ताथवडे येथील पवार वस्तीतील बापुजी बुवा बोगदा येथे रस्ता ओलांडणा-या 75 वर्षीय वृद्धाला एका ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये वृद्ध नागरिक गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. ही घटना काल (मंगळवारी) रात्री पावणे आठ्च्या सुमारास घडली.

धर्मा उमाजी शिंदे (वय.75 रा. अशोकनगर, ताथवडे), असे मयत वृद्ध नागरिकाचे नाव आहे.

काल रात्री ते रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात ट्रकचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी चालकाने शिंदे हे जखमी झालेले पाहताच तेथून पळ काढला. त्यामुळे गंभीर जखमी शिंदे यांचा या अपघातात मृत्यू झाला.

याविषयी शिंदे यांचा नातू गणेश शिंदे याने वाडक पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध तक्रार दिली असून पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.