Pune : पोलीस कर्मचा-यांना धक्काबुक्की करणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज- उलट्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालविणाऱ्या चालकाला पोलिसांनी अडविले असता त्यांच्याशी वाद घालून धक्काबुक्की करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. घटना काल मंगळवारी (दि.30) सकाळीसाडेदहा च्या सुमारास लोहगाव येथील लोहगाव वाघोली रस्त्यावरील आकाश ढाब्यासमोर घडली.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व्हि. डी. धावडे यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक रामदास येवले (वय 22, खराडी), मंगेश विठ्ठल गायकवाड ( वय 28, रा. चंदननगर, खराडी), नवनाथ यशवंत हारगुडे (वय 32, रा. केसनंद, हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धावडे हे त्यांच्या सहका-यासोबत तपासासाठी कारमधून जात असताना समोरून उलट्या दिशेने भरधाव वेगात एका कारमधून तिघेजण येताना त्यांना दिसले. त्यामुळे धावडे यांनी त्यांना गाडी सावकाश चालविण्याचा इशारा केला व आवाज देऊन त्यांना समजावले.

दरम्यान आरोपीँनी गाडी थांबवली आणि गाडीतून उतरून ते धावडे यांच्याजवळ आले व धावडे यांच्यासह त्यांच्या सहका-याशी वाद घालून अपशब्द वापरत त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी तिघांना अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.