Pune : मेट्रो मार्ग अतिक्रमणमुक्त करा ;विभागीय आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज- पुणे महामेट्रोचे काम कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर यांनी दिल्या. तसेच शासकीय जागेमधील मेट्रोच्या मार्गावरील अतिक्रमणे तातडीने हटवण्याचा सूचना विभागीय आयुक्त यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पुणे महामेट्रोच्या कामांची आढावा बैठक डॉक्टर म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, महामेट्रो चे रामनाथ सुब्रमण्यम, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे , मेट्रोचे सहव्यवस्थापक प्रल्हाद कचरे, आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मेट्रोच्या मार्गीकेवरील राजीव गांधी नगर, जुना तोफखाना आणि कामगार पुतळा येथील झोपडपट्ट्यांच्या बाधित भागांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मेट्रोच्या कामावेळी शिवाजीनगर बसस्थानकाच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी जागा शोधणे, तसेच मल्टी ट्रान्सपोर्टचा बांधकामावेळी स्वारगेट बस स्थानकाचा तात्पुरत्या स्थलांतरसाठी जागा शोधण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच शिवाजीनगर येथील भुयारी मेट्रो मार्गासाठीच्या एसटी महामंडळाच्या जागेबाबत चर्चा करण्यात आली. मेट्रोसाठी पुणे महापालिकेच्या मालकीच्या आवश्यक जागांबाबतही चर्चा करण्यात आली. काही भागात पुरातत्त्व विभागाचा ना हरकत दाखला मिळणे आवश्यक आहे याविषयी देखील चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.