Sangvi: तीन लाखाच्या सोन्या-चांदीवर चोरट्यांचा डल्ला

 

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कुलूप कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील तीन लाख रुपये किमतीचे दहा तोळे सोने चांदीचे दागिणे लंपास केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.16)मध्यरात्री दीड ते अडीचच्या सुमारास घडला. 

याप्रकरणी ज्ञानेश भगवान मुळीक (वय 30, रा. क्रांती चौक, नवी सांगवी)यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुळीक हे शुक्रवारी घरी नव्हते. घराचा दरवाजा बंद करुन ते बाहेरगावी गेले होते. मध्यरात्री दरवाजाचा कुलूप कोयंडा उचकटून चोरटे घरात घुसले. घरातील तीन लाख रुपये किमतीचे दहा तोळे सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.