Pimpri : शॉर्टसर्किटमुळे नेहरुनगर येथील सराफी पेढीला आग   

एमपीसी न्यूज – बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे पिंपरीतील शिवम ज्वेलर्स या सराफ दुकानाला आज (शनिवारी)आग लागली. धुर बाहेर जाण्यासाठी दुकानाची काच काढत असताना ती फुटल्याने झालेल्या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. 
पिंपरी, नेहरूनगर येथे शिवम ज्वेलर्स या नावाने सराफ दुकान आहे. आज साडेचारच्या सुमारास या दुकानाला बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी त्वरित दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. यादरम्यान दुकानातील धूर बाहेर काढण्यासाठी काच काढत असताना काच फुटूली. त्यामध्ये तीन जण किरकोळ जखमी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.