Wakad : व्हाट्सअॅप वर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – एका अनोळखी इसमाने महिलेच्या व्हॉट्स अॅपवर अश्लील फोटो पाठवून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि.24) सायंकाळी पाचच्या सुमारास कस्पटेवस्ती वाकड येथे घडली.

याप्रकरणी एका 26 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या व्हॉट्स अॅपवर अश्लील फोटो पाठवले. त्यावर महिलेने थेट वाकड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.