Pune -15 हजारांची लाच स्विकारणा-या कोतवालास एसीबी पथकाने पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज – जागेची सात-बारा उता-यावर नोंद घेण्यासाठी 15 हजारांची लाच स्विकारणा-या कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून आज गुरूवारी (दि.29) अतुलनगर येथे रंगेहाथ पकडले.

सुखदेव दत्तात्रय शिंदे(वय 53) असे शिवणे येथील लाच स्विकारणा-या कोतवालाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जागेची सात-बारा उता-यावर नोंद घेण्यासाठी अर्ज केला होता. परंतु शिवणे येथील कोतवाल सुखदेव शिंदे यांनी तक्रारदाराकडे जमीनीची सात-बारा उता-यावर नोंद घेण्यासाठी 15 हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने ही बाब पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली असता आज त्या तक्रारीची पडताळणी करून कोतवाल सुखदेव शिंदे यांना त्यांच्या अतुलनगर येथील घरासमोर 15 हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले.

लाच स्विकारणा-या कोतवालसुखदेव शिंदे यांच्यावर वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत. ही कामगीरी पोलीस उप आयुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.