Pune -10 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकास एसीबीच्या पथकाने पकडले रंगेहाथ.

अपघातातील वाहन परत देण्यासाठी लाचेची मागणी

एमपीसी न्यूज – अपघातातील वाहन परत देण्यासाठी 10 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या लोणी काळभोर येथील पोलीस नाईकास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज शुक्रवारी(दि.30) लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या परिसरात रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. त्यामुळे त्या वाहनाची आर.टी.ओ. कडून तपासणी करून ते वाहन तक्रारदार यांना परत देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक लोकेश राऊत यांनी तक्रारदाराकडे चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाच मागितल्यामुळे त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक याप्रकरणी तक्रार नोंदवली.

या तक्रारीची पडताळणी करून आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पोलीस नाईक राऊत यांनी चाळीस हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ताडजोडीअंती 10 हजारांची लाच मागितल्याचे उघडकीस आले.त्याप्रमाणे आज लोणी काळभोर परिसरात सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकास तक्रारदारा कडून 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारणाऱ्या राऊत यांच्यावर लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.