Pune : दोन हजारांची लाच घेताना महावितरणचा उप कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – विजेचा खांब दुसरीकडे (Pune) शिफ्ट करण्याच्या कामाला मंजुरी देण्यासाठी महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याने दोन हजारांची लाच घेतली. लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उप कार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 4) उरुळी कांचन येथील महावितरण कार्यालयात करण्यात आली.

धम्मपाल हौसाजी पंडित (वय 50) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या उप कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी 31 वर्षीय ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सरकारी ठेकेदार आहेत. एका खासगी जमीन मालकाने त्यांच्या सोरतापवाडी येथील जमिनीतील विजेचा खांब दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी काम दिले होते. त्या कामाची फाईल महावितरणचे उप कार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित यांच्याकडे प्रलंबित होती. ती फाईल मंजूर करण्यासाठी पंडित याने दोन हजारांची लाच मागितली.

Chinchwad : शाळेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला पाच लाखांचे अर्थसहाय्य

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने (Pune) सोमवारी महावितरण कार्यालयात सापळा लावला. पंडित याला दोन हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.