Chinchwad : शाळेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला पाच लाखांचे अर्थसहाय्य

एमपीसी न्यूज – चिंचवडगावातील शाळेत (Chinchwad) जिन्यावरून खाली येत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या प्रस्तावास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर शाळेत 16 फेब्रुवारीला दुर्दैवी घटना घडली. आठवीचा विद्यार्थी सार्थक हर्षवर्धन कांबळे हा शाळेतील जिन्यातून खाली येताना दुस-या मजल्यावरून पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदतीची मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली होती. तसेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Pune : उत्तर प्रदेशमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ पुण्यात कॉँग्रेसचे आंदोलन

या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थितीचा विचार (Chinchwad) करून त्यांना पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 2014 मध्ये महापालिकेच्या एका शाळेत विद्यार्थ्यांच्या भांडणात ऋषिकेश बापू सरोदे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राज्य शासनाच्या आदेशानुसार त्याच्या पालकांना दोन लाखांची आर्थिक मदत केली होती. त्याच आधारे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.