Moshi: ‘व्हॉटसअॅप’वर मॅसेज पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – मोबाईलवरून वारंवार फोन करून तसेच ‘व्हॉटसअॅप’ वर मॅसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मोशी येथे राहणा-या 34 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9689257504 आणि 7588269436 या मोबाईल धारकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील क्रमांकावरुन एक इसम महिलेला सतत फोन करुन त्रास देत होता. तसेच त्याने : ‘व्हॉटसअॅप’वर मॅसेज करुन सलगी साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या वाढत जाणा-या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.