Vadgaon Maval : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी वाटपाचा मावळमध्ये शुभारंभ

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा वाटपाचा शुभारंभ काल, सोमवारी महसूल भवन वडगाव मावळ येथे करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी सुभाष बागडे, नायब तहसीलदार समीर यादव, सुनंदा भोसले, कृषी अधिकारी व्ही वाय धेंडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, सहायक निबंधक सूर्यवंशी,गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी उपस्थित होते.

प्रांताधिकारी सुभाष बागडे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी खास शेतकऱ्यांसाठी ही योजना आमलात आणली आहे, त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. ,

शेतकऱ्यांचे वतीने अनंता कुडे म्हणाले, ” ही योजना राबवताना अधिकाऱ्यांनी शेतकरी वर्गाला ही योजना समजावून सांगून जास्तीत जास्त लाभार्थी मावळ तालुक्यात होतील असे सहकार्य करावे”. गुलाबराव म्हाळसकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.