Bhosari : महाशिवरात्रीनिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिराचा 300 नागरिकांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज- महाशिवरात्री निमित्त आज, सोमवारी बुधराणी हॉस्पिटल पुणे व महाशिवरात्री उत्सव मंडळ महादेवनगर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले.  या शिबिराचा 300 नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी हरीनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमांचे उदघाटन मंडळाचे अध्यक्ष आत्माराम मुळूक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक सागर गवळी यांच्या हस्ते 300 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार नागेशशेठ वसतकार, विकास तट, धनवे, सचिव झांबरे, वसंतराव वसतकार, सुनील रेटवडे, सांगडे गुरुजी, सोनवणे गुरुजी, संदीप पंडित, अभिजित तापकीर, मंडळाचे सदस्य शिर्के, चव्हाण, मारुती जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप धोत्रे यांनी केले. शिवरात्रीच्या दिवशी मोफत दूध वाटप ,खिचडी वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.