Talegaon : नोकरीचे अमिष दाखवून तरुणाला 90 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज – नोकरी देण्याचे अमिष दाखवून त्याच्याकडून बँक खात्यावर 90 हजार रुपये भरण्यास सांगितले. पैसे घेऊन देखील नोकरी न देता तरुणाची फसवणूक केली. हा प्रकार 29 एप्रिल ते 9 सप्टेंबर दरम्यान तळेगाव दाभाडे येथे घडला.

योगेश राजेंद्र तोडकर (वय 29, रा. ज्ञानेश्वर नगर, तळेगाव दाभाडे) या तरुणाने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल ते 9 सप्टेंबर या कालावधीत योगेश याला चार मोबाईल फोनवरून नोकरी देण्यासाठी फोन आले. फोनवरून मुनीम नावाची व्यक्ती बोलत असल्याचे सांगितले. तसेच एक महिला देखील फोनवर बोलत होती. त्यांनी योगेश याला नोकरी देण्याचे अमिष दाखवले. नोकरी देण्यासाठी त्याच्याकडे 90 हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे त्यांनी त्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यास सांगितले. योगेश याने संपूर्ण रक्कम आरोपींच्या बँक खात्यावर पाठवली. पैसे मिळून सुद्धा नोकरी दिली नाही. यावरून आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच योगेश याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.