Talegaon Dabhade : आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत हुजेफा शेख व सृष्टी बांदल यांना प्रत्येकी दोन सुवर्णपदके

एमपीसी न्यूज- भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर अबुधाबी येथे रोलर स्केटिंग मध्ये तळेगाव दाभाडे येथील जय वकील शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. हुजेफा आयुब शेख या विद्यार्थ्याने 300 व 500 मीटर रोलर स्केटिंगमध्ये दुसरा क्रमांक घेऊन तर सृष्टी गणेश बांदल हिने 500 व 1000 मीटरमध्ये दोन रौप्यपदके पटकावली

आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलम्पिकची स्पर्धा सौदी अरेबिया येथील अबुधाबी येथे भरविण्यात आली होती. या स्पर्धेसाठी भारताकडून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारासाठी 300 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या चाचण्या व खडतर परिश्रमातून रोलर स्केटिंग करता हुजेफा शेख व सृष्टी बांदल या दोन खेळाडूची निवड करण्यात आली होती. या दोन्ही खेळाडूंनी चार रौप्य पदके मिळवून दिल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या दोन्ही खेळाडूचे जय वकील शाळेच्या मुख्याध्यापिका नयना डोळस व शिक्षक, पालक व सर्व विद्यार्थ्यांनी ढोल व फटाके वाजवून स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.