Lonavala : शहर भाजपाच्या अध्यक्षपदी श्रीधर पुजारी तर सरचिटणीसपदी समीर इंगळे

एमपीसी न्यूज- भारतीय जनता पक्षाच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विजय निर्धार मेळाव्यात लोणावळा शहर भाजपाची नूतन कार्यकारणी व कोअर कमिटी जाहीर करण्यात आली.

गुढीपाडव्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या मेळाव्यास सर्व कार्यकर्त्यांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याप्रसंगी लोणावळा शहराच्या विविध विभागातून जवळपास 125 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा, भावीन कपाडिया, श्रेयस खंडेलवाल, भावेश रूपावत, गौरव लवाटे, सोनाली दळवी, सुनीता साखरे तसेच हुडको, हनुमान टेकडी, तुंगार्ली, रेल्वे विभाग येथील अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. भाजपा अध्यक्ष श्रीधर पुजारी व नगराध्यक्ष सुरेखा जाधव व राजाभाऊ खळदकर यांनी या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाची शपथ दिली.

या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंद कुलकर्णी, नगरसेवक देविदास कडू, भरत हारपुडे, बाळासाहेब जाधव, ब्रिंदा गणात्रा, जयश्री आहेर, मंदा सोनवणे, रचना सिनकर, गौरी मावकर, माजी नगरसेवक रामविलास खंडेलवाल, दिलीप मानकामे, भगवान तनवाणी, विजय सिनकर, हेमा इंदुलकर, कांचन लुणावत, नवीन भुरट, आशिष बुटाला, विनय विद्वांस, संतोष गुप्ता, भाजयुमो कार्याध्यक्ष अरुण लाड व सर्व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपास्थित होते.

लोणावळा शहर भाजपा कार्यकारिणी

श्रीधर सोमाप्पा पुजारी (मंडल अध्यक्ष), समीर इंगळे (सरचिटणीस), रुपाली रावत व पल्लवी चोरडिया (सह सरचिटणीस), राजाभाऊ खळदकर (संघटनमंत्री) तर उपाध्यक्ष पदी सचिन पत्की, अनिल खिल्लारे, कमलेश सेंगर, अनिष गणात्रा, मंगेश कचरे, राजु परदेशी, देवा दाभाडे, राजेंद्र शर्मा, संतोष गुप्ता, अप्पा देशमुख, प्रदिप थत्ते, मोहन राव यांची निवड करण्यात आली. यासह अनिल गायकवाड (खजिनदार), नवीन भुरट (प्रचार व प्रसिध्दीप्रमुख), नंदू जोशी (उपप्रमुख), अरविंद कुलकर्णी (प्रवक्ता), विनय विद्वांस (कोअर कमिटी निमंत्रक)

भाजपा युवा मोर्चा : अजय सुरेश जाधव (अध्यक्ष) आकाश मावकर (कार्याध्यक्ष), धवल चौहान (सरचिटणीस), त्यागराज पांढरे (सह सरचिटणीस), पक्षाल पालरेचा व ओंकार खानोलकर (उपाध्यक्ष)

लोणावळा शहर महिला आघाडी

योगिता भरत कोकरे (अध्यक्ष),
सोनल ओसवाल (सरचिटणीस),
विजया मराठे, लता दाभाडे, परिजा भिल्लारे, योगिता जाधव, प्रिया देसाई, चारुलता कमलवार (उपाध्यक्ष).

व्यापारी आघाडी अध्यक्ष : गिरीश मुथा, संतोष चोरडिया (सरचिटणीस)
युवती आघाडी अध्यक्ष : कु. शारदा अनिल गायकवाड
कला व क्रीडा आघाडी : अध्यक्ष सुनील बोके
सोशल मीडिया : अध्यक्ष राकेश कुंदन रावळ
अल्पसंख्याक आघाडी : प्रकाश व्होरा (अध्यक्ष), जावेद शेख (उपाध्यक्ष)
कामगार आघाडी : अध्यक्ष अंकुश महाडिक
सहकार आघाडी अध्यक्ष : दत्ता तांदळे
वाहतूक आघाडी अध्यक्ष : बाळकृष्ण चिकणे
ओबीसी आघाडी अध्यक्ष : योगेश जाधव
कायदा आघाडी अध्यक्षा : अँड. मोनाली दिनेश शेलार
अनुसूचित जाती व जमाती अध्यक्ष : दीपक कांबळे, सदा आहेर (कार्याध्यक्ष), शिरीष शिंदे (उपाध्यक्ष)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.