Lonavala : भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्याचा आनंद लोणावळा शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करून साजरा केला.

महिनाभराच्या नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर आजची सकाळ उजाडली ती देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाल्याच्या बातमीने, सर्वत्र शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार अशी राळ उठलेली असताना अचानक देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या शपथविधी महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का देणारा ठरला.

भाजपाचा मुख्यमंत्री झाल्याची बातमी समजताच शिवाजी महाराज चौकात भाजपा कार्यकर्ते व नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष व भाजपाचे शहराध्यक्ष श्रीधर पुजारी, महिलाध्यक्षा योगिता कोकरे, नगरसेवक देवीदास कडू, बाळासाहेब जाधव, भरत हारपुडे, आरपीआयचे शहराध्यक्ष कमलशिल म्हस्के, विलास इंगूळकर, सुरेखाताई पाडाळे, अरुण लाड, अनिल गायकवाड, सुनिल तावरे, ललित सिसोदिया, गिरीश मुथ्था, शशिकांत मानकर, राजु परदेशी, प्रदीप थत्ते, मंदाताई सोनवणे, शशी आगरवाल, शौकत शेख अशा अनेकांच्या घोषणांनी चौक दणाणून सोडला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.