Chakan : भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 

एमपीसी न्यूज- मोटारसायकलला भरधाव अवजड कंटेनरची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार कामगार ठार झाल्याची घटना चाकण तळेगाव रस्त्यावर खालुंब्रे  ( ता. खेड) गावाच्या हद्दीत शनिवारी  (दि. २२) सकाळी घडली. या प्रकरणी चाकण पोलिसांत अवजड कंटेनर चालकावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुदाम दादाभाऊ गावडे  (वय ३० वर्षे, रा. इंदोरी,  ता. मावळ, जि. पुणे) असे  दुर्घटनेत  ठार झालेल्या दुचाकीस्वार कामगाराचे नाव आहे . कृष्णा भैरू जाधव  ( वय ३३ , रा. सांगुर्डी ता. खेड) यांनी या बाबत चाकण पोलिसांत फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक ज्ञानेश्वर सुभाषराव गवळी ( वय ३४, रा.आळंदी, केळगाव, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, सुदाम गावडे आपल्या दुचाकीवरून ( क्र.एम एच १४ ए एक्स २८३२)  तळेगाव कडून चाकणच्या दिशेने  येत असताना खालुंब्रे गावाच्या हद्दीत  भरधाव वेगात विरुद्ध बाजूकडून आलेल्या कंटेनरने  ( क्र. एम एच २३ ए यु १४९६) दुचाकीस जोरदार धडक दिली.

यामध्ये गावडे यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.  चाकण पोलिसांत याबाबत अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे अनिल गोरड करीत आहेत.

वडगाव – तळेगाव -चाकण ते शिक्रापूर या महामार्गावरील प्रचंड अवजड वाहतूक, नागमोडी वळणे, कमी रुंदी, आणि अपघातप्रवण ठिकाणे यामुळे हा महामार्ग धोकादायक झाला आहे.  या रस्त्याचे लालफितीत अडकलेले काम  सुरू करण्याची मागणी होत आहे.  या मार्गावर दुचाकीस्वार , पादचारी चिरडले जाणे, गॅस टँकर धोकादायक वळणांवर उलटणे, सिग्नल चौकात वाहने एकमेकांवर आदळणे, रस्ता दुभाजक नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होणे असे प्रकार सातत्याने होत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.