Thergaon : महाराष्ट्र शाहीर परिषदेतर्फे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्रशाला, थेरगाव येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस परिषदेचे कार्याध्यक्ष शाहीर प्रकाश ढवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यत आला. यावेळी परिषदेचे प्रांत सदस्य राजेंद्र आहेर, मुख़्याध्यापिका वर्षा गणबावले, अर्चना चव्हाण, रजनी आहेर, योगिता परबत, उर्मिला राजे, शिवाजी दौंडकर आदी उपस्थित होते.
शाहीर प्रकाश ढवळे यांनी व्याख्यानांतून शाहू महाराज यांचे शिक्षण विषयक कार्य, शेतीविषयक धोरण, जाती भेद निवारण, मल्लविद्या कलावंत याना प्रोत्साहन, आंतरजातीय विवाह, वेदोक्त बंदी यविषयीचे निर्णय, राधानगरी धरण, कोल्हापुरी बंधारे, राज्यात नोकरीमध्ये आरक्षण आशा रयतेसाठी घेतलेल्या कल्याणकारी योजना अशा सर्व पैलूविषयी माहिती दिली. बालशाहीर प्रथमेश थोरात व सहकारी यांनी राजर्षी शाहू महाराज यांचा पोवाडा सादर केला. प्रास्ताविक वर्षा गणबावले यांनी केले तर सूत्रसंचलन उर्मिला राजे यांनी केले व आभार राजेंद्र आहेर यांनी मानले.