Pimpri : हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र सेल स्थापणार १० कोटींची तरतूद – आयुक्त हार्डिकर

शहर फेरीवाला समितीची बैठक संपन्न

एमपीसी न्यूज – शहरातील फेरीवाला घटकांना कायद्यानुसार लाभ देण्यासाठी महानगरपालिकेत हॉकर्स प्रोग्राम मॅनेजमेंट यूनिट सुरु करुन पथारी, हातगाडी, टपरी धारकाचे सर्व विषय हाताळण्यात यावेत, असे सांगत स्वतंत्र सेल स्थापण्याचे आदेश आज शहर फेरीवाला समिती अध्यक्ष तथा आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी आज झालेल्या शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत दिले.

मनपा आयुक्त कक्षात झालेल्या बैठकीस सहा आयुक्त मंगेश चितळे, अतिक्रमण विभाग प्रमुख राजन पाटील, सहा आयुक्त  स्मिता झगडे, महाराष्ट्र  फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, विजय शहापूरकर, मानिषा राउत, डॉ. सरोज अम्बिके, राजेंद्र वाघचौरे, प्रवीण कांबळे, कविता खराडे, दामोदर मांजरे, क्षत्रीय अधिकारी अशा दुर्गुडे, मनोज लोनकर, आण्णा बोदडे, विजय खोराटे, संदीप खोत, श्रीनिवास दांगट आदी उपस्थित होते.

यावेळी नखाते यांनी शहरातील सर्व विक्रेत्यावर अन्यायकारक कारवाई केली जात आहे. एकीकडे कायदा अंमलबजावणी सोडून गोरगरिबांना हटवण्यात येत आहे. आयुक्तांनी दिलेल्या हॉकर्स झोनबाबत आदेशाचे क्षेत्रीय कर्यालयाकडून व स्थापत्यकडून पालन होत नाही. या विभागाकडून फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र नुतनीकरण केले जात नाही आणी फेरिवल्यांना दोषी ठरवले जात आहे. क्षेत्रीय कार्यालयात फेरीवाला अपात्रचे पात्र करणे व नुतनीकरणासाठी चकरा मारत आहेत. शहर उपसमितीने सुचवलेल्या जागाबाबत सुरुवातीला ५ जागा होकर्स  झोन मॉडलसाठी तातडीने सुरुवात करावी. राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गतचे लाभ आजही एकाला ही मिळालेले नाहीत ते लवकर द्यावेत.

यावर अयुक्तांनी फेरीवाला विषय जलद मार्गी लागण्यासाठी सुमारे दहा कोटींची तरतूद केली असून त्यानुसार सर्वेक्ष, हॉकर्स झोन, प्रशिक्षण आदी कामकाज हॉकर्स प्रोग्राम मनेजमेंट यूनिटमधून केले जाणार आहे. सदस्यांनी मांडलेल्या विषयावर आयुक्तांनी आज सकारात्मक विचार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.